

Buy anything from 5,000+ international stores. One checkout price. No surprise fees. Join 2M+ shoppers on Desertcart.
Desertcart purchases this item on your behalf and handles shipping, customs, and support to Spain.
महानता तुमच्या आतमध्येच आहे. आता वेळ आली आहे तिला जागृत करण्याची तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का? तुम्ही तुमच्या उद्देश्याच्या दिशेने यात्रा करत आहात की त्यापासून दूर जात आहात? तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ते तसंच चालू ठेवून तुम्हाला स्वत:विषयीची हीच कथा चालू ठेवायची आहे की तुम्हाला वेगळ्या भवितव्याची अपेक्षा आहे? लुईस होवेस या न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर लेखकाने त्यांच्या अभ्यासांती हे पुस्तक लिहिलं आहे ज्यामध्ये आपल्या भूतकाळावर मात करून आपलं भविष्य अधिक शक्तिशाली आणि समृद्ध कसं करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं आहे. वैयक्तिक अनुभव, शास्त्रशुद्ध धोरणे आणि जगप्रसिद्ध व यशस्वी लोकांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही सहजतेने पुढील गोष्टी करू शकाल : तुम्ही तुमचं अर्थपूर्ण मिशन ठरवून तुमच्या जीवनाच्या उद्देश्याच्या दिशेने वाटचाल करू शकाल. तुमच्यामधील आत्मशंकेमागील खरं कारण काय आहे हे शोधून तुम्हाला मागे खेचणार्या गोष्टींवर मात करू शकाल. स्वत:ला निराश करणार्या विचारांपासून मुक्त होऊन तुम्ही समृद्ध जीवन जगायला सुरुवात कराल. तुमच्यामधील महानतेला साध्य करून तुमच्या भोवतालच्या लोकांवर तुम्ही सकारात्मक परिणाम घडवू शकाल. या पुस्तकातील धडे आणि धोरणे अंमलात आणून तुम्ही महानतेच्या मानसिकतेच्या आधारे तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणू शकाल. तुम्ही तयार आहात का? तुमची महानतेची यात्रा सुरू होत आहे! Review: Book Review - 'द ग्रेटनेस माईंडसेट' हे पुस्तक म्हणजे एक आत्मचिंतन करायला लावणारं पुस्तक आहे. लुईस होवेस यांनी लिहिलेलं हे पुस्तक, मराठीत प्रसाद ढापरे यांच्या सहजसुंदर भाषेत अनुवादित केलं आहे. हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं, की आपली खरी क्षमता काय आहे, आणि ती कशी जागृत करता येईल. अनेकदा आपण आपल्या मनात निर्माण झालेल्या भीती, शंका, आणि नकारात्मकतेमुळे मागे पडतो. पण हे पुस्तक त्या साखळदंडांना तोडायला शिकवतं. लुईस होवेस त्यांच्या अनुभवांतून सांगतात की महान होण्यासाठी तुमच्याकडे असामान्य कौशल्य असावं लागत नाही, तर एक सकारात्मक, चिकाटीची आणि उद्दिष्टपूर्तीकडे नेणारी मानसिकता असावी लागते. पुस्तकात दिलेले उदाहरणं, आत्मनिरीक्षणाचे प्रश्न आणि सल्ले खूप उपयोगी पडतात. हे पुस्तक केवळ प्रेरणादायी नाही, तर वाचकाच्या आत डोकावून त्याला स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद देतं. विशेषतः ज्या वाचकांनी अजूनही आपली दिशा ठरवलेली नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरू शकतं.




| Best Sellers Rank | #63,989 in Books ( See Top 100 in Books ) #209 in Emotional Self Help #506 in Self-Help for Happiness #4,392 in Personal Transformation |
| Customer Reviews | 4.5 out of 5 stars 15 Reviews |
P**E
Book Review
'द ग्रेटनेस माईंडसेट' हे पुस्तक म्हणजे एक आत्मचिंतन करायला लावणारं पुस्तक आहे. लुईस होवेस यांनी लिहिलेलं हे पुस्तक, मराठीत प्रसाद ढापरे यांच्या सहजसुंदर भाषेत अनुवादित केलं आहे. हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं, की आपली खरी क्षमता काय आहे, आणि ती कशी जागृत करता येईल. अनेकदा आपण आपल्या मनात निर्माण झालेल्या भीती, शंका, आणि नकारात्मकतेमुळे मागे पडतो. पण हे पुस्तक त्या साखळदंडांना तोडायला शिकवतं. लुईस होवेस त्यांच्या अनुभवांतून सांगतात की महान होण्यासाठी तुमच्याकडे असामान्य कौशल्य असावं लागत नाही, तर एक सकारात्मक, चिकाटीची आणि उद्दिष्टपूर्तीकडे नेणारी मानसिकता असावी लागते. पुस्तकात दिलेले उदाहरणं, आत्मनिरीक्षणाचे प्रश्न आणि सल्ले खूप उपयोगी पडतात. हे पुस्तक केवळ प्रेरणादायी नाही, तर वाचकाच्या आत डोकावून त्याला स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद देतं. विशेषतः ज्या वाचकांनी अजूनही आपली दिशा ठरवलेली नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरू शकतं.
Trustpilot
1 day ago
2 months ago